
कोल्हापूर : कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,न्युरोसर्जरी विभागाने अत्यंत जटील, जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ग्रामीण भागात अशा जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी आता अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच सिद्धगिरी हॉस्पिटल येथे दाखल झाला आहे.न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाशिवरात्रीच्या पावन पर्वदिनी सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे हा सोहळा बुधवार ता. २६ रोजी सकाळी १० वा.पार पडणार आहे. या मशनरीमुळे मेंदूच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या रुग्णांना लाभ होणार आहे. अशी माहिती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींजींनी यावेळी पत्रकार परिषदेत केले.
सतरा वर्षाच्या सिद्धगिरी हॉस्पिटलची वाटचाल सुरु असून धर्मादाय श्रेणीतील रुग्णालयांमध्ये मुंबई ते बेंगलोर दरम्यान सर्व सोयीसुविधा एकाच छताखाली रुग्णांना उपलब्ध करून देणारे हे प्रमुख हॉस्पिटल आहे. आता ZEISS PENTERO 800 S या अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोपची भारतातील पहिली स्थापना कणेरी सारख्या एका ग्रामीण धर्मादाय रुग्णालयात होत असल्याचा आनंद न्युरो सर्जन आणि सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले. मायक्रोस्कोपचा उपयोग मेंदू आणि मणक्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या शस्त्रक्रिया सहजपणे करणे शक्य होणार आहे अशा प्रकारच्या या मशीनमध्ये 4K – 3D कॅमेरा सिस्टीम मुळे अतिशय सुस्पष्ट दृष्टी आणि त्रिमितीय प्रतिमा दिसणार आहे अशी माहिती यावेळी दिली.
यासोबतच पूर्णवेळ न्यूरो भूलतज्ञ,न्यूरो पॅथॉलॉजिस्ट,CT, MRI स्वतंत्र न्यूरो आय सी यु या सुविधांमुळे सिद्धगिरी येथील न्यूरो विभाग राष्ट्रीय स्तरावर नावारूपास येत आहे. या सुविधा ना नफा ना तोटा या तत्त्वावरती वाजवी दरात रुग्णांसाठी उपलब्ध आहेत तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन न्यूरो भूलतज्ञ डॉ.प्रकाश भरमगौडर यांनी केले.
यावेळी प्रास्ताविक विवेक सिद्ध यांनी केले तर या पत्रकार परिषदेस डॉ. स्वप्नील वळीवडे,डॉ. निषाद साठे, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण,अमित गावडे यांच्यासह हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते.