कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली दुर्बीनीद्वारे बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. कोल्हापूरमधील 65 वर्षीय रुग्ण, जो दीर्घकाळापासून किडनी विकाराने त्रस्त होता आणि एक दिवस आड डायलिसिस घेत होता, त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने बायपास शस्त्रक्रिया अत्यावश्यक बनली.सिद्धगिरी रुग्णालयाचे हृदयरोग व शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. सयाजीराव सरगर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही अत्यंत जटील …