कोल्हापूर: कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य-दिव्य महविजय संकल्प सभा कोल्हापूर येथे संपन्न झाली. युवकांना संधी देणारे, महिलांना सशक्त करणारं, समाजातील वंचित घटकाला न्याय देणारे असं सामान्य जनतेचे सरकार पुन्हा एकदा निवडून द्या, त्यासाठी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. असे आवाहन यावेळी मोदी यांनी प्रचंड संख्येने …