कोल्हापूर : कोल्हापूरची सुकन्या आणि विविध वाहिन्यांवरील नाटकांमध्ये उल्लेखनीय भुमिका करणार्या अमृता धोंगडे ही सध्या बीग बॉस मराठी या रिऍलिटी शोची प्रमुख स्पर्धक आहे. कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली ही स्पर्धा अंतिम टप्प्यात असून, त्यामध्ये टॉप फाईव्ह स्पर्धकांमध्ये अमृताची निवड झालीय. आता तिला बीग बॉस जिंकण्यासाठी भरपूर मतांची गरज आहे. कोल्हापूर वासिय कलाकारांच्या पाठीशी नेहमीच उभे राहतात आणि भरभरून पाठबळ …