कोल्हापूर : केंद्र सरकारने बेळगाव केंद्रशासित प्रदेश करावा. तसेच सीमाभागातील मराठी बांधवांच्यावरील अत्याचार तातडीने थांबवावेत, अशी जोरदार आणि आग्रही मागणी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली. आमदार श्री. मुश्रीफ यांच्या मागणीला सभागृहातील सर्वच आमदारांनी बाकी वाजवून समर्थन केले.यावेळी आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात पंधरवड्यापूर्वी धरणे आंदोलनही झाले होते. त्यामध्ये सीमा भागातील …