घराण्याची परंपरा जपण्यासाठी दक्ष पण तितकेच संवेदनशील महाराज (बाबा) : संभाजीराजे श्री शाहु छत्रपती महाराजांचा आज ७५ वा वाढदिवस संपन्न होत आहे. मला आदर्शवत आणि खऱ्या अर्थाने माझे मार्गदर्शक असलेल्या बाबांच्या विषयी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे. छत्रपती घराण्याची थोर परंपरा जपण्यासाठी अहोरात्र दक्ष असणारे महाराज, बाबा म्हणून ही तितकेच संवेदनशील आहेत. लहानपणापासून त्यांनी आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव …