
कोल्हापूर : लतादीदी आज आपल्यात नसल्या तरी त्या स्वर स्वर – गात (स्वर्गात) आहेत अशी भावना मनात ठेवून त्यांना आदरांजली म्हणून प्रा. सतीश उपळावीकर यांनी लतादीदी अनंतात विलिन होताना रात्री १० ते १२ :४५ या वेळेत चित्र रुपात अक्रालिक माध्यमात ब्रशच्या सहाय्याने माझ्या भावना चित्र रुपात अवतरल्या. यामध्ये मुलगा ऋषिकेश याचीही मदत झाली. लतादीदींना कलेच्या माध्यमातून भावपूर्ण चित्रांजली देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.