
चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट तर्फे सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे आयोजन
कोल्हापूर : मधुमेहाचा सामना करण्यासाठी आणि मधुमेहाची वाढती समस्या आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटने सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२२ व्हर्चुअल चे आयोजन केले आहे. दरवर्षी, चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट भारत आणि परदेशात वैद्यकीय व्यावसायिक, संशोधक आणि पॅरा-मेडिको व्यावसायिकांसाठी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे आयोजन करते. या परिषदेचा उद्देश मधुमेहावर मात करण्यासाठी अद्ययावत संशोधन व ज्ञानासह आरोग्य सेवा देणाऱ्यांना सक्षम बनविणे हा आहे.०४ मार्च ला प्रो. निल्स-गोरन लार्सन, (कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूट येथील फिजिओलॉजी आणि मेडिसिनसाठी नोबेल पारितोषिक समितीचे अध्यक्ष, कॅरोलिंस्का युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, स्टॉकहोम, स्वीडन येथील वैद्यकीय आणि जैवरसायनशास्त्र आणि जैवभौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख), प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. तर ०६ मार्च रोजी मेयो क्लिनिक हेल्थ सिस्टीम यूएसएच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा वर्के, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
या परिषदेमध्ये रूग्णालयात रक्तातील साखरेचे नियंत्रण, मधुमेह व्यक्तींची काळजी, ग्लूकोजचे प्रमाण, डायबेटीस केअरमध्ये काही नवीन संशोधन, डायबेटीस हार्टफेल्युअर, इंसुलिनपंप, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, आठवड्यातून एकदा इंजेक्शन्स, डायबेटीस व्यवस्थापनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची भूमिका, मधुमेहाचे रिमोट मॉनिटरिंग, मधुमेह रुग्णांची काळजी घेणे या गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे.