Home News दुबईतील महाबीज कॉन्फरन्समधील सहभागातून महाराष्ट्रातील व्यावसायिकांना व्यवसाय विस्तारण्याची संधी

दुबईतील महाबीज कॉन्फरन्समधील सहभागातून महाराष्ट्रातील व्यावसायिकांना व्यवसाय विस्तारण्याची संधी

6 second read
0
0
21

बिझनेस कोचसह ब्रिजमोहन टुरिझमची वैशिष्ट्यपूर्ण दुबई टूर करण्याची संधीकोल्हापूर/प्रतिनिधी : सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेणार्‍या ‘दुबई एक्स्पो’ प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व्यावसायिकांना दुबईमध्ये होऊ घातलेल्या ‘महाबीज बिझनेस कॉन्फरन्समध्ये’ सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक येथील प्रसिध्द ब्रिजमोहन टुरिझमने बिझनेस कोचसह स्पेशल दुबई टूरचे आयोजन करण्यात आल्याची माहीती प्रसिध्द बिझनेस कोच अतुल ठाकूर व ब्रिजमोहन टुरिझमचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.याविषयी अधिक माहीती देतांना श्री.ब्रिजमोहन चौधरी म्हणाले की, दि. १२ ते १७ फेब्रुवारी दरम्यान ‘दुबई एस्न्पो’च्या माध्यमातून ‘गल्फ फूड फेअर’ या महत्त्वाच्या खाद्य-पेय आणि कृषी संदर्भातील प्रदर्शनाला भेट देता येईल आणि महाराष्ट्रीयन व्यावसायिकांसाठी महत्त्वाच्या अशा ‘महाबीज बिझनेस कॉन्फरन्सला’  उपस्थिती लावता येईल तसेच गरजे प्रमाणे दोन दिवसाची ‘दुबई लोकल व्हिजीट’ ची टूर ही करता येईल. या टूरचे विशेष म्हणजे या संपूर्ण दौर्‍यात आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बिझनेस कोच अतुल ठाकुर व त्यांची टीम राहणार असून व्यावसायिक संधी व नेटवर्किंग यावर आपल्याला मार्गदर्शन करतील.  आंतरराष्ट्रीय व्यवसाय वाढावा यासाठी सदर दुबई दौर्‍यात उद्योजकांना सातत्याने मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जीएमबीएफ ग्लोबल हि आखाती देशातील विविध क्षेत्रातील महाराष्ट्राशी निगडित असलेल्या उद्योजक व व्यावसायिकांनी स्थापन केलेली प्रसिद्ध व विश्वासार्ह अशी अग्रगण्य संस्था आहे. १५ पेक्षा जास्त वर्ष कार्यरत असलेल्या या संस्थेचे ५०० पेक्षा जास्त सभासद आखाती , मध्य पूर्व ,आफ्रिकन  देशात  आहेत.  जीएमबीएफ ग्लोबल च्या सातत्याने केलेल्या कार्यामुळे आज महाराष्ट्रातील अनेक उद्योजक व व्यावसायिक यांच्या उत्पादनांना व सेवांना जागतीक बाजारपेठ मिळाली आहे .या वर्षी १८ व १९ फेब्रुवारी २०२२ महाबिझचे आयोजन करण्यात आले असून नाशिकची ब्रिजमोहन टुरिझम ट्रॅव्हल पार्टनर म्हणून काम बघत असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रसिध्द बिझनेस कोच लाईफ कॅटलिस्ट प्रा.लि.चे सीईओ अतुल ठाकूर म्हणाले की, गाइडेड बिझनेस टूर चे फायदे असे असतात, ज्यामध्ये टूर पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रेसेंटेशन कसे असावे यावर मार्गदर्शन केले जाते, दुबई मध्ये एक तीन तासांचे सेशन ज्यामध्ये दुबई स्थित व्यवसायिकांचे मार्गदर्शन, संपूर्ण टूर दरम्यान रोज ूेेा  वर ट्रेनिंग, महाराष्ट्रीय व्यावसायिक हा आपल्याला लोकांसोबत लेाषळीींरलश्रश असतो तिथे महाराष्ट्रीयन व्यवसायिकांशी नेटवर्किंग व व्यवसायाची संधी त्याचप्रमाणे नेमक्या पद्धतीने कॅम्युनिकेशन कसे करावे ह्या विषयी मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.ज्येष्ठ उद्योजक श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले की, २०२० मध्ये दुबई येथे कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रातील हजारो उद्योजक सहभागी झाले होते. या कॉन्फरन्समुळे अनेक उद्योजकांना आपले उद्योग विस्तारण्यासाठी फायदा झाला. यंदाही मोठ्या प्रमाणात उद्योजकांना सहभागी होण्याची संधी असून व्यापार विस्तारण्यास चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.गल्फ फ्रुड फेअर-दुबई एक्स्पो आणि महाबिज कॉन्फरन्स सोबत बिझनेस कोच असलेली ही टूर चार रात्री आणि पाच दिवस असणार आहे.  पाच दिवसांमध्ये मुंबई टू मुंबई ६० हजार + जीएसटी व महाबिज कॉन्फरन्ससाठी रजिस्ट्रेशन फी १२ हजार असा असणार आहे. यामध्ये दुबई सिटी टूर, दाऊ क्रुज आणि डेझर्ट सफारी समाविष्ट असल्याची माहीती त्यांनी यावेळी दिली. याशिवाय अधिक माहीती जाऊन घेण्यासाठी ९४२२२७२००२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस जगदीश कुलकर्णी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…