Home News रक्तातील कॅन्सर बरा होतो; रुग्णांनी दखल घ्यावी : डॉ गणपुले

रक्तातील कॅन्सर बरा होतो; रुग्णांनी दखल घ्यावी : डॉ गणपुले

3 second read
0
0
16

कोल्हापूर : कॅन्सर हा आजार बरा होऊ शकतो. रुग्णांनी याची दखल घेऊन घाबरून न जाता उपचारासाठी पुढे येणे गरजेचे आहे. टाळाटाळ न करता वेळेत उपचार घेतल्यास रुग्ण वाचु शकतो अशी माहिती रोगविकार तज्ञ डॉ अभिजित गणपुले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आपल्याकडे आलेल्या ५० पेक्षा जास्त रुग्णांना बरे केले आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा,सांगली व इस्लामपूर याठिकाणाहून रूग्ण येत असतात. डॉ. अभिजित गणपुले हे २०१५ सालापासून हिमाटोलॉजी रक्त आणि रक्तातील विकार म्हणजेच रक्ताचे रुग्ण यांच्यावर राजारामपुरी येथे त्यांच्या निश हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. जेव्हा शरीरात बरीच असामान्य पांढर्‍या रक्त पेशी तयार होतात. आणि अस्थिमज्जाच्या लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स बनविण्याच्या क्षमतेत हस्तक्षेप करतात तेव्हा हा कर्करोग उद्भवतो.
रक्त हा शरीरातील सर्वात कार्यक्षम घटक, रक्तवाहिन्या या शरीरातील वाहतूक यंत्रणाच असते. रक्ताचा कॅन्सर सर्व वयातील व्यक्तींना होतो. पण लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. यात रक्तातील पांढर्‍या पेशींच्या निर्मितीमध्ये दोष निर्माण होतो.
अनुवंशिकता, किरणोत्सार, रासायनिक औषधे व विषाणू ही त्याचे कारणे आढळतात.
रक्ताचा कॅन्सर कुठल्याही वयात होऊ शकतो. लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. ताप येणे, वारंवार सर्दी, खोकला होणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, किरकोळ जखमांमधून दीर्घकाळ रक्तस्त्राव होणे, सांधे दुखणे, किरकोळ मार लागल्यावर रक्त गोठणे, सूज येणे, अशक्तपणा येणे, रक्त कमी होणे, भूक मंदावणे, यकृतावर सूज येणे, हाडांना वेदना होणे, लसिका ग्रंथींना सूज येणे ही लक्षणे आढळतात. काही रुग्णांमध्ये डोकेदुखी, उलट्या होणे, चेहरा वाकडा होणे असेही त्रास आढळतात.असे डॉ. अभिजित गणपुले यांनी सांगितले.
रक्ताच्या तपासणीत पांढर्‍या पेशींची संख्या कमी किंवा अधिक आढळल्यास याचे निदान करता येते. कमरेच्या हाडातून मगज काढून त्याची तपासणी करण्यात येते.
लहान मुलांना रक्ताचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शतो. अलीकडच्या काळातील विविध संशोधनांमुळे रक्ताच्या कॅन्सरवरील उपचार यशस्वी होऊ शकतात. या रुग्णांचा दृढ निश्चय व सहनशीलता महत्त्वाची असते. या उपचारात रुग्णांना भरपूर पोषक आहार द्यावा लागतो असेही डॉ. अभिजित गणपुले यावेळी म्हणाले. यावेळी रुणांनी आपले अनुभव सांगितले. यावेळी बोलताना डॉ. गौतमी गणपुले यांनी कॅन्सर मधून बऱ्या झालेल्या रुग्णांनी आता या आजाराबाबत प्रबोधन करावे आणि ती आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. प्रकाश गणपुले, डॉ. गौतमी गणपुले,अनघा गणपुले उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…