
कोल्हापूर : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशिर्वादाने सन २००७ साली लावलेल्या “शिवालय” शिवसेना शहर कार्यालय या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार आजपर्यंत राजकीय क्षेत्रात काम करत आलो असून, शिवसेना पक्षप्रमुख आणी राज्याचे मुख्यमंत्री नाम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवालय मंदिरातून जनसेवेचे व्रत अखंडित जोपासू. “शिवालय” रंजल्या, गांजल्या व गोरगरीब – वंचितांसाठीचा आधारवड बनेल, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. जनसेवेचे मंदिर आणि सेनाभवनाचे प्रतिबिंब असलेल्या “शिवालय” शिवसेना शहर कार्यालयाचे शिवसेना वर्धापनदिनी झालेल्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
लाखो नागरिकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी १२ महिने २४ तास जनसेवेत कार्यरत राहण्यासाठी या शिवालय मधून प्रेरणा मिळत आहे. शिवालय हि नुसती वास्तू नसून, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी निर्माण झालेलं प्रेरणास्थान आहे. आगामी काळात शिवालय मधून समाजोपयोगी कामांची घोडदौड अखंडित सुरु राहील. शिवालय हे शिवसेनाभवनाचे प्रतिबिंब असून, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे बालेकिल्ले पुन्हा जिंकून शिवसेनेस गतवैभव प्राप्त करून देवू, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, सौ.दिशा ऋतुराज क्षीरसागर यांनी मान्यवरांच्या शुभेच्छा स्विकारल्या.यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, कॉंग्रेस शहरअध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राहुल चव्हाण,नगरसेवक नंदकुमार मोरे, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, मा.नगरसेवक राजू हुंबे, मा.नगरसेवक आदिल फरास, महिला आघाडी शहरप्रमुख सौ.शुभांगी साळोखे, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, दीपक गौड, किशोर घाटगे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, निलेश हंकारे, दीपक चव्हाण, अश्विन शेळके, रियाज बागवान, पियुष चव्हाण, चेतन शिंदे, कपिल सरनाईक, महिला आघाडीच्या श्रीमती पूजा भोर, सौ.शाहीन काझी, सौ.पूजा कामते, रुपाली कवाळे, सौ.पूजा पाटील, कपिल नाळे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.