Home Info राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत भारती हॉस्पिटलमध्ये आज व उद्या २२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत भारती हॉस्पिटलमध्ये आज व उद्या २२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

3 second read
0
0
21

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत भारती हॉस्पिटलमध्ये आज व उद्या २२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

कोल्हापूर  : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त कृतज्ञता पर्व निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकराजाला मानाचा मुजरा म्हणून कृतज्ञता पर्व निमित्त भारती हॉस्पिटलच्या वतीने भारती विद्यापीठाचे भारती हॉस्पिटल, आयटी पार्क समोर, हॉकी स्टेडियम जवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे येथे आज शनिवार दिनांक २१ व उद्या रविवार २२ मे २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचे व त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून हे आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये पोटाचे विकार, हृदयाचे विकार, श्वसनाचे विकार, यकृताचे विकार, स्त्री-रोग, हाडांचे विकार, त्वचा रोग, बालरोग, वात व्याधी, अंतःस्त्रावी ग्रंथीविकार, मुळव्याध, भगंदर, वंध्यत्व मुतखडा, लघवीचे विकार, मधुमेह या विकारांवर तज्ञ व अनुभवी डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य तपासणी, आहार विषयक सल्ला व मार्गदर्शन सवलतीच्या दरामध्ये औषधोपचार, सवलतीच्या दरामध्ये रक्तामधील साखर तपासणी (Random blood sugar ). आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या संकल्पनेतून व कार्यकारी संचालक डॉ.अस्मिताताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात नोंद केलेल्या रुग्णांसाठी भारती विद्यापीठाचे भारती हॉस्पिटल, आय.टी. पार्क समोर,मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे सवलतीच्या दरामध्ये पंचकर्म उपचार देण्यात येणार आहेत, असे भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अभिजित शिंदे यांनी कळवलेआहे.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In Info

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…