
कृषी प्रदर्शन व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्या २० रोजी उद्घाटन
कोल्हापूर, दि.१९: राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन, प्रकल्प संचालक, आत्मा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या वतीने श्री शाहू छत्रपती मिल येथे २० ते २२ मे २०२२ दरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दि.२० मे रोजी सकाळी १२ वाजता होणार आहे.जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवार, दिनांक २० मे २०२२ रोजी दुपारी ४ वाजता खासबाग कुस्ती मैदान येथे हिंद केसरी , महाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय पैलवान यांच्या समवेत होणार आहे.