
मुंबई: शिवसैनिकांनी सांगावे मी पक्षप्रमुखपद सोडेल. फक्त शिवसैनिकाने समोर येऊन सांगावे.असे
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. बहुमत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण मला उद्धव ठाकरे नको, असे बंडखोर आमदारांपैकी कोणी सांगायला हवे, असे ते म्हणाले. तत्पुर्वी एकनाश शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात 34 आमदारांच्या सह्या होत्या. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतामध्ये आलं आहे.
आधी प्रशासनाचा अनुभव नसतांना मी मुख्यमंत्रीपद सांभाळले. त्याचवेळी कोरोना आला. त्याकाळात उल्लेखनीय कामे केली. त्याची दखल घेतली गेली आणि पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले. माझ्यावर एक आरोप होत आहे की, मुख्यमंत्री भेटत नव्हते. हे गेल्या काही दिवसांपुर्वी बरोबर होते. परंतु त्यानंतर मी भेटायला सुरु केेली. त्यावेळेस मी भेटत नसतांना कामे कधी थांंबली नव्हती.
शिवसेना कोणाची आहे? काही जण म्हणतात, ही शिवसेना बाळासाहेबांची नाही. बाळासाहेब गेल्यानंतर 2014 साली मी स्वत:च्या ताकदीवर 63 आमदार निवडून आणले. काही जण बाळासाहेबांच्या शिवसेनेनंतर मंत्री झाले. तेव्हा त्यांना वाटली नाही का?