Home News विरोधी पक्ष म्हणून भविष्यात रस्त्यावरील संघर्षासाठी सज्ज राहण्याचे केले आवाहन

विरोधी पक्ष म्हणून भविष्यात रस्त्यावरील संघर्षासाठी सज्ज राहण्याचे केले आवाहन

0 second read
0
0
12

कागल :रडणारा नव्हे लढणारा माझा कार्यकर्ता आहे, असे उद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. विरोधी पक्ष म्हणून भविष्यात रस्त्यावरील संघर्षासाठी सज्ज रहा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.कागलमध्ये कागल, गडहिंग्लज – उत्तुर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते.भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, पावणेतीन वर्षांपूर्वी ज्या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली त्याच क्षणी दुसरी शपथ घेतली ती म्हणजे, ग्रामीण महाराष्ट्राचा किंबहुना विकास कामांच्या माध्यमातून कागल विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याची. विकास कामांसाठी निधी देण्यामध्ये कसलीही हयगय केली नाही.

एवढी प्रचंड विकासकामे केली आहेत की येणाऱ्या दहा वर्षात कोणतेही काम करावे लागणार नाही.ते पुढे म्हणाले, गोरगरिबांच्या निराधार योजनेचे काम ही तर आपली पुण्याईची शिदोरीच आहे. तसेच आरोग्य सेवाही अव्यहातपणे सुरूच आहे. कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे कोटकल्याण करणारी योजनाही प्रभावीपणे राबवली, असेही ते म्हणाले.गेल्या पावणेतीन वर्षातील मंत्रिपदाच्या सत्तेच्या माध्यमातून आंबेओहोळ प्रकल्प, नागणवाडी प्रकल्प, उचंगी प्रकल्प, काळम्मावाडी धरणाचे पाणी कालव्यातून थेट कागलच्या श्रीमंत जयसिंगराव तलावात आणणे, सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांचे ऐतिहासिक स्मारक, सुळकुडचा पूल, बसतवडे पूल ही मोठी कामे झाल्याचेही ते म्हणाले.यावेळी कागल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले.व्यासपीठावर मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील, दलितमित्र डी. डी. चौगुले, जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील -गिजवणेकर, मनोज फराकटे, वसंतराव धुरे शशिकांत खोत, बिद्रीचे संचालक प्रविण भोसले, जगदीश पाटील, सुर्याजी घोरपडे, सुधीर देसाई यांच्यासह कागल, मुरगूड व गडहिंग्लज नगरपरिषदेचे पदाधिकारी, पंचायत समितीचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…