
आंबेओहळच्या भिजक्षेत्रात हरितक्रांती घडवू; होन्याळीमध्ये आठ कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण
उत्तूर : आंबेओहळ प्रकल्प शेतक-यांच्या त्यागातून साकारला आहे. या प्रकल्पाच्या भिजक्षेत्रात हरितक्रांती घडवू, असा विश्वास आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
होन्याळी (ता.आजरा) येथील आठ कोटीच्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती वसंतराव धुरे होते.
आमदार मुश्रीफ यांचे हस्ते ग्रामपंचायत इमारत, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पुर्ण झालेले होन्याळी ते करडेवाडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, संरक्षक भिंत, पाणंद रस्ते या विकास कामांचे उद्घाटन झाले.
आमदार मुश्रीफ म्हणाले आंबेओहळ प्रकल्प पुर्ण झाला आहे. आता प्रकल्पातील पाणी उचलण्याची जबाबदारी शेतक-यांची आहे. सार्वजनिक पाणी योजना राबविण्यासाठी सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना सहकार्य करणार आहे.
यावेळी सरपंच काशिनाथ तेली, माजी सभापती वसंतराव धुरे, चिमणेचे माजी सरपंच संभाजी तांबेकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमास मारुतीराव घोरपडे, शिरीष देसाई, दिपक देसाई, सागर सरोळकर, गटविकास अधिकारी अविनाश पाटील, उपअभियंता सुर्यकांत नाईक, उपअभियंता पी. डी. माने, वसंतराव पाटील, ॲड. संग्राम गुरव उपस्थीत होते.
सरपंच काशिनाथ तेली यानी स्वागत केले. सुरेश दास यानी सुत्रसंचालन केले. उपसरपंच सागर वाघरे यानी आभार मानले. होन्याळी ता. आजरा ग्रामपंचायत इमारत उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आमदार हसन मुश्रीफ. सरपंच काशिनाथ तेली, माजी सभापती वसंतराव धुरे, ग्रामपंचायत पदाधिकारी व मान्यवर.