
बाळासाहेबांच्या शिवसेनेची सीमा बांधवांना ताकद; बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून रॅलीद्वारे पाठींबा
कोल्हापूर : कर्नाटक सरकार गेली ६६ वर्षे सीमाबांधवांवर अन्याय करत आहे. कर्नाटकात होणाऱ्या मराठी बांधवांच्या गळचेपी विरोधात नेहमीच कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले आहे. सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनास बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून हजारोंच्या संख्येने दुचाकी रॅलीद्वारे जाहीर पाठींबा देणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी जाहीर केले होते.
आज बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या सुचनेनुसार हजारोंच्या संख्येने भव्य दुचाकी रॅलीद्वारे मोर्चात सहभागी होण्यासाठी शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे एकत्र झाले. या वेळी भगवे ध्वज, भगव्या टोप्या, मफलर याद्वारे सज्ज झाले. यानंतर समस्त पदाधिकारी आणि शिवसैनिक शिवालय मार्गे कोल्हापूर महानगरपालिका, माळकर तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रॅलीमध्ये सहभागी झाले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “सीमाबांधवांची गळचेपी करणाऱ्या कर्नाटक शासनाचा धिक्कार असो” अशा घोषणांनी रॅली परिसर दणाणून सोडला. या रॅलीमध्ये “बाळासाहेबांची शिवसेनाच सीमाप्रश्न सोडविणार”, “सीमाप्रश्नी ज्यांनि बलिदान दिले ते बलिदान व्यर्थ जाणार नाही म्हणून हा लढा”, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे स्वप्न सीमा प्रश्न लवकरच सुटणार” यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे लक्षवेधी फलक रॅलीत सहभागी झाले.
यावेळी बोलताना युवानेते ऋतुराज क्षीरसागर यांनी, मराठी भाषिक जनतेचा सीमाप्रश्नाचा सुमारे ६६ वर्षांचा हा लढा सुरू आहे. सिमावासियांवर होणाऱ्या अन्याया विरोधात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळसाहेब ठाकरे यांनी नेहमीच आवाज उठविला आहे. सीमा लढ्यात शिवसेनेने ६९ हुतात्म्ये दिले तर स्वत: शिवसेनाप्रमुखांनी कारावास भोगला आहे. सीमावादाची पहिली प्रतिक्रिया नेहमीच कोल्हापुरातून उमटली असून, सीमा वासीयांच्या पाठीशी कोल्हापूरचे शिवसैनिक नेहमीच उभे राहिले आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी कन्नड रक्षक वेदिकेच्या गुंडांना कोल्हापुरच पाणी पाजलं आहे. तेव्हा खुद्द शिवसेनाप्रमुखांनी क्षीरसागर साहेब व शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेचे कौतुक केले आहे. सद्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून, राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सीमाबांधवांना न्याय मिळेल आणि बाळासाहेबांची शिवसेनाच सीमा प्रश्न मार्गी लावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र सीमा बांधवांच्या पाठीशी उभा असून, शिवसेनाप्रमुखांनी सीमा वासीयांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेना हा एकमेव पक्ष या सीमालढ्यात नेहमीच सीमाबांधवांच्या खांद्याला खांदा लावून लढला आहे. आताही राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सीमा बांधवांना ताकद देण्यासाठी मोर्चात सहभागी होत आहोत. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटून शिवसेनाप्रमुखांचे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल, असे प्रतिपादन केले.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, उप-जिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, प्रा.शिवाजी पाटील, शहर समन्वयक सुनील जाधव, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण, जिल्हाप्रमुख अॅड.चेतन शिंदे, शहरप्रमुख पियुष चव्हाण, मंदार पाटील, विश्वदीप साळोखे, योगेश चौगले, अश्विन शेळके, अंकुश निपाणीकर आदी शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.