
कोल्हापूर येथे ई-फिलमधून मान्यता मिळाली. तसेच अक्षय पाटील यांनी वर्षभरातील दिवाळी मोहिमेचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल कंपनीकडून त्यांना ईव्ही कार भेट देण्यात आली. आज डीवायपी सिटी मॉल येथे एका कार्यक्रमाद्वारे हा ईव्ही कार प्रदान करण्याचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ई-फिल इलेक्ट्रिक, ईएफईव्ही चार्जिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ची संपूर्ण टीमने या यशाबद्दल अक्षय पाटील यांचे हार्दिक अभिनंदन केले.
ई-फिल मोहिमेचे विजेते अक्षय पाटील यांनी त्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात ईव्ही चार्जरचा व्यवसाय यशस्वीपणे वाढवल्याबद्दल एक नवीन टाटा टिगोर ईव्ही कार जिंकली. गेल्या वर्षी सुरू झालेली ही मोहीम आव्हानात्मक आणि महत्त्वाकांक्षी होती. तथापि, अक्षयच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि उत्कृष्टतेसाठी वचनबद्धतेमुळे, लक्ष्य पूर्ण केले. असे अक्षय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. याप्रसंगी बोलताना विक्री आणि विपणन प्रमुख रघुवीर सिंग म्हणाले, अक्षय पाटील हे ई-फिल च्या कुटुंबातील एक अनमोल सदस्य आहेत आणि आमच्या ग्राहकांना अपवादात्मक सेवा देण्यासाठी त्यांची अतुलनीय बांधिलकी आहे. पाटील आमच्या टीममध्ये आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आणि भविष्यात आणखी मोठे यश मिळवण्यासाठी एकत्र काम करत राहण्यास आम्ही उत्सुक आहोत.त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल, ई-फिल यांचे कौतुक करते. या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ई- फिलच्या कोल्हापूर लोकेशनच्या संपूर्ण टीमचेही आम्ही आभार त्यांनी मानले.