
सिराज सय्यद फाउंडेशनतर्फे रमजान ईद फेस्टिवलचे आयोजन
उत्कृष्ट दर्जेदार व रास्त दरातील उत्पादनांच्या अनेक स्टॉलचे असणार अनोखे दालन
कोल्हापूर : येत्या २२ एप्रिल २०२३ रोजी मुस्लिम बांधवांचा रमजान ईदचा सण साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने लागणाऱ्या साहित्यांची एकाच ठिकाणी, एकाच छताखाली उपलब्धता व्हावी या हेतूने सिराज सय्यद फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट दर्जेदार व रास्त दरातील उत्पादनांचे प्रथमच अनेक स्टॉलचे अनोखे दालन येथील दसरा चौक मैदानावर येत्या १५ ते २१ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.या दालनामध्ये रमजान ईद फेस्टिवल निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.तसेच हे दालन सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असणार आहे,अशी माहिती हिदायत मणेर आणि साजिद सय्यद व स्वप्नील सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या फेस्टिवलचे उदघाटन १५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ,आमदार सतेज पाटील,माजी आमदार मालोजीराजे छत्रपती,आमदार ऋतुराज पाटील उदगावचे प्रसिद्ध मौलाना उबेदूल्ला इराणी यांच्या उपस्थितीत दसरा चौक येथे होणार आहे.
आपल्या व्यवसायाची माहिती व्याप्ती व्हावी व आपले उत्पादन या रमजान ईद फेस्टिव्हलच्या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी हे दालन याठिकाणी उभे करण्यात आले असून यात एकूण ९५ स्टॉलचा समावेश आहे. यात १० महिला बचत गटास मोफत स्टॉल देण्यात आले आहेत. आतापर्यंत ८० स्टॉल ची नोंदणी झाली आहे.
सात दिवस चालणाऱ्या या रमजान ईद फेस्टिव्हलमध्ये शेवया,दूध व दुग्धजन्य पदार्थ,ड्रायफ्रूट, बेकरी उत्पादन,रोट, तांदूळ,मसाले, क्रॉकरी,इमिटेशन ज्वेलरी,चप्पल,मेकअप साहित्य,होजिअरी,गारमेंट्स,टू. व्हीलर व फोर व्हीलर,फर्निचरआदी साहित्य खरेदी करता येणार आहे.सात दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये १९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता इफ्तार पार्टी व २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता मेहंदी स्पर्धा आणि २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता समारोप फेस्टिव्हलचा समारोप होणार आहे.
सेल्फी पॉइंट हे विशेष आकर्षण असणार आहे.शिवाय उदघाटन प्रसंगी जेष्ठ पत्रकार नाना पालकर,कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे,फरहान मकानदार यांचा व कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मणेर मस्जिद, आरोग्यदूत बंटी सावंत,सागर चौगुले सामजिक ऐक्याची भावना जोपासणाऱ्या हिंदू बांधवांचा देखिल सत्कार केला जाणार आहे.फेस्टिवल दरम्यान सात दिवस मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी क्रिसेंट हॉस्पिटल चे सहकार्य लाभले आहे. रमजान ईद व अक्षय तृतीया हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होत आहेत. हा एक दुग्धशर्करा योग असुन हिंदू मुस्लिम यांचे यातून ऐक्य जपले जाणार आहे. स्काय स्टार इव्हेंट यांनी संयोजन केले आहे.यावेळी पत्रकार परिषदेला मुजीप महात,स्वप्नील सावंत आदी उपस्थित होते.