Home News भारत पेट्रोलियमच्यावतीने इंधन बचत व इंधन संवर्धनासाठी २४ एप्रिल ये ८ मे पर्यंत प्रबोधनात्मक उपक्रम

भारत पेट्रोलियमच्यावतीने इंधन बचत व इंधन संवर्धनासाठी २४ एप्रिल ये ८ मे पर्यंत प्रबोधनात्मक उपक्रम

0 second read
0
0
8

भारत पेट्रोलियमच्यावतीने इंधन बचत व इंधन संवर्धनासाठी २४ एप्रिल ये ८ मे पर्यंत प्रबोधनात्मक उपक्रम

कोल्हापूर  : इंधन बचत व इंधन संवर्धनविषयी वाहनधारक व नागरिकांत जागृती होण्यासाठी २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू केले आहेत. या कार्यक्रमांतर्गत पेट्रोल पंप, धाबा, महामार्ग याठिकाणी वाहनधारकांना इंधन बचतीचे महत्व पटवून दिले जाईल. असे भारत पेट्रोलियमचे सेल्स मॅनेजर नानासाहेब सुगांवकर यांनी सांगितले.
पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना, पेट्रोलियम-नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांनी पुढाकार घेत जनजागृती उपक्रम राबवत आहेत राज्यामध्ये सुमारे ८०० उपक्रम होणार आहेत.
इंधन बचत आणि संवर्धनसंबंधीच्या या प्रबोधनात्मक उपक्रमासंबंधी माहिती सांगताना भारत पेट्रोलियमचे वरिष्ठ व्यवस्थापक नानासाहेब सुगांवकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण, वादविवाद स्पर्धेचे नियोजन आहे. इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन,महाविद्यालयीन पातळीवरील भित्तीचित्र स्पर्धा असे या उपक्रमांचे स्वरूप राहणार आहे. इंधन आणि तेल संवर्धनासाठी शालेय विद्यार्थी, शिक्षकांचा त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात येणार आहे . पत्रकार परिषदेला भारत पेट्रोलियमचे सहायक सरव्यवस्थापक आकाश गुंडे, तुषार चव्हाण उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…