
कोल्हापूर/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विकसित भारत संकल्पनेमुळे देशातील शेतकरी प्रगती पथावर आहे त्यातून शेतीत वेगवेगळे प्रयोग करणे व आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे त्यातून २०४७ साला पर्यंत कृषी क्षेत्रातील स्वावलंबी आणि आत्म निर्भर भारताचे स्वप्न साकार होईल असे उदगार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले.भीमा कृषी प्रदर्शनात आयोजित आदर्श शेती भूषण व आदर्श जिजामाता पुरस्कार सह शेती क्षेत्रात उलेखणीय कार्य केलेल्या व पिके घेतलेल्या शेतकऱ्यांचा पुरस्कार व बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी आता ड्रोनचा वापर करून शेती करता येते पाणी दोन तासात शेतीला एकरी करता येते.जमिनीची वाटणी झाल्याने उत्पन्न कमी होत चालले आहे त्यामुळे जमिनीत वेगवेगळे प्रयोग करून आंतरपीके घेतली गेली पाहिजेत असे सांगितले.ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग केले आहेत त्याचा प्रसार त्यांनी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी केवळ ५४ टक्के शेतकरी हे शेतीपूरक व्यवसायावर आधारित आहेत सकल उत्पादनात केवळ १६ टक्केच शेतकरी उरला आहे.शेतकऱ्यांना योग्य दिशा दाखवून आर्थिक विकासाची कास धरण्याकडे वळविणे आवश्यक असल्याचे सांगून आता शेती व्यवसाय आधुनिक शेती व्यवसाय झाला असून रेशीम व मधमाशी उद्योग करण्याकडे शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहनजिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केले.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा असे सांगून मराठा वाड्यातील शेतकरी जादा उत्पन्न शेतीतून मिळवत आहे.त्यामुळे येणारा काळ सोपा नसल्याने शेतकऱ्यांनी सावध होणे आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी बोलताना माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी कोल्हापूर जिल्हा कृषी पंढरी म्हणून ओळखला जातो याठिकाणी शेतकरी चौकस आहे नवनवीन तंत्र तो आत्मसात करत आहे.मात्र विदर्भ आणि मराठ वाड्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत हा मोठा चिंतेची बाब आहे असे सांगितले.त्यामुळे अशा कृषी प्रदर्शनाची माहिती आत्मसात करून शेती करावी असे आवाहन केले.यावेळी बोलताना माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी आपण व आपले वडील प्रगत शिल शेतकरी कसे बनलो याची माहिती सांगून पुण्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील उत्कृष्ठ भीमा कृषी प्रदर्शन असल्याचे सांगून याठिकाणी लाखो शेतकरी भेट देऊन माहिती घ्यावी असे आवाहन केले.प्रास्ताविक विश्वराज महाडिक यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार अमल महाडिक,श्री शाहू ग्रुप चेअरमन श्री.राजे समरजीत घाटगे, महाराष्ट्र राज्य भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.शौमीका महाडिक,भागीरथी महिला अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक,भाजप सरचिटणीस महेश जाधव, भाजप पदाधिकारी हिंदूराव शेळके ए. वाय.पाटील,रिलायन्स पॉलीमर्सचे सत्याजित भोसले जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगारदिवे आदी उपस्थित होते.