
जोतिबा डोंगर:पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. जोतिबा देवाला अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन केले होते. केडीसीसी बँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी पन्हाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर म्हणाले, जिल्ह्याचे नेते, गोरगरिबांचे- दिन दलितांचे कैवारी पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांना दीर्घायुष्य मिळावे, त्यांच्या यशाचा रथ असाच पुढे जावा, सर्व संकटे दूर व्हावीत म्हणून श्री ज्योतिर्लिंगाच्या चरणी जोतिबा येथे महाअभिषेक घालण्यात आला. त्याचप्रमाणे एका आश्रममध्ये फळे वाटपाचा कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष निवासराव ढोले, तालुकाध्यक्ष दाजी पाटील, तालुका महिला अध्यक्ष सौ. राधा बुणे, जिल्हा सरचिटणीस अर्जुनदादा चौगुले, जिल्हा कार्यकारणी सदस्य अंगद शेवाळे बापू, पोर्ले तर्फ ठाणेचे उपसरपंच अरुण पाटील शाहुवाडी पन्हाळा विधानसभा युवक अध्यक्ष सर्जेराव सासणे, पन्हाळा तालुका युवक अध्यक्ष विश्वजीत सांळोखे, बाबासाहेब पाटील, युवक संघटना अध्यक्ष भरत शिंदे, पन्हाळा तालुका विद्यार्थी अध्यक्ष साहिल मुल्लाणी यांची उपस्थित होती.