
कोल्हापूर : गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा भाग असलेल्या गोदरेज अँड बॉयसच्या सुरक्षाविषयक उपाय सुविधा व्यवसायाने ज्वेलरी क्षेत्रासाठी खास तयार केलेली अत्याधुनिक उच्च सुरक्षा उत्पादन श्रेणी सादर केली आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे निर्धारित केलेल्या नव्याने तयार केलेल्या वर्ग ई मानकांचे पालन करून, नव्याने सादर केलेली डिफेंडर ऑरम प्रो तिजोरी DPIIT (वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय) द्वारे जारी केलेल्या नवीनतम गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे पालन करते. डिफेंडर ऑरम प्रो ज्वेलर्सना सर्व संभाव्य चोरीच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचे आश्वासन देते. गोदरेजने व्यापक संशोधन आणि विकासाद्वारे विकसित केलेल्या प्रगत बॅरियर सामग्रीसह तयार केलेली ही तिजोरी उत्कृष्ट साधन प्रतिरोधक क्षमता पुरविते. जोडीला त्यात एक स्लीक आणि आधुनिक फेशिया, उत्कृष्ट ग्रिपसाठी एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले गोल हँडल आणि अंतर्गत रचना याने युक्त आहे. पत्रकार परिषदेत गोदरेज अँड बॉयसच्या सिक्युरिटी सोल्युशन बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख पुष्कर गोखले म्हणाले, “गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपमध्ये आमचा या गोष्टीवर विश्वास आहे की सुरक्षा ही केवळ मालमत्तेचे संरक्षण करण्याबद्दल नसते. तर सुरक्षा ही मनःशांती मिळवून देण्याबद्दल असते. आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित असल्याचे जाणून मिळणाऱ्या आनंदाबद्दल असते. डिफेंडर ऑरम प्रो क्लास ई तिजोरीच्या सादरीकरणातून आम्ही भारतातील ज्वेलर्सच्या बदलत असलेल्या सुरक्षाविषयक गरजा पूर्ण करत आहोत. कोल्हापूर ही आमच्या व्यवसायासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यात रिटेलर्स आणि डीलर्स देखील आहेत. आमच्या ग्राहकांच्या वाढत्या गृह सुरक्षा गरजांची पूर्तता करत आणि जिथे आमचा महत्त्वपूर्ण ग्राहक आधार आहे तिथे आमचे रिटेल स्थान मजबूत करत कोल्हापुरातील शिवाजी उद्यमनगर येथील नवीन दालनाच्या उद्घाटन करत आहोत. भारत सरकारने भारतात उत्पादित आणि विकल्या जाणार्या सर्व उच्च-सुरक्षा तिजोरींवर गुणवत्ता शिक्का (क्वालिटी हॉलमार्क) म्हणजे BIS लेबल असणे आवश्यक केले आहे. या QCO चे पालन करणे ही विक्रेत्याची जबाबदारी आहे. ते पुढे म्हणाले, “सुरक्षितता आणि तिजोरी उद्योगातील बाजारपेठेतील अग्रणी म्हणून, आमच्या उत्पादनांचा अनुभव वेगळा, सर्वोत्तम असण्याची अपेक्षा आमचे ग्राहक करतात याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच आम्ही आज वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या अलीकडील QCO च्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी आलो आहोत.”
अभियांत्रिकी आणि डिझाइन-प्रणीत दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करून, गोदरेजने आपल्या भागधारकांना सेवा देणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपायसुविधा विकसित केल्या आहेत. गोदरेजने अलीकडेच स्मार्टफॉग प्रणाली सादर केली आहे. ही यंत्रणा शून्य दृश्यमानतेसह धुक्याचा अडथळा तयार करून घुसखोरांना त्वरित अडथळा निर्माण करते. अॅक्यूगोल्ड गोल्ड प्युरिटी टेस्टिंग मशीनही कंपनीने सादर केले आहे. त्यामुळे ज्वेलर्सना त्यांच्या ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेची खात्री देता येते. गोदरेजचा सुरक्षाविषयक उपाय सुविधा पोर्टफोलिओ घरे, बँकिंग, ज्वेलर्सपासून इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत विविध उद्योगांना सेवा पुरवतो.