Home Commercial के.एम.टी. ला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर* *के.एम.टी. च्या विविध प्रश्नासंदर्भात महानगरपालिकेत बैठक

के.एम.टी. ला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर* *के.एम.टी. च्या विविध प्रश्नासंदर्भात महानगरपालिकेत बैठक

0 second read
0
0
28

के.एम.टी. ला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

के.एम.टी. च्या विविध प्रश्नासंदर्भात महानगरपालिकेत बैठक

कोल्हापूर दि.२१ : कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असूनही नागरिकांना सुविधा मिळावी या हेतूने के.एम.टी. सेवा प्रशासनामार्फत अविरत सुरु ठेवण्यात आली आहे. त्याचा आर्थिक बोजा महानगरपालिका प्रशासनावर पडत असल्याने के.एम.टी.च्या उत्पन्न वाढीचे प्रयत्न होवून, इलेक्ट्रिक बसेस, तेजस्विनी योजना आदी माध्यमातून के.एम.टी. विभागास उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाकडे पाठपुराव करू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या विविध प्रश्नी आज कोल्हापूर महानगरपालिका येथे आढावा बैठक पार पडली.
बैठकीच्या सुरवातीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी के.एम.टी. सेवेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, पर्यावरण मंत्री नाम.श्री.आदित्य ठाकरे साहेबांनी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याबाबत अद्यादेश जारी केले आहेत. सद्या कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक स्थिती आणि वाढते इंधन दर पाहता इलेक्ट्रिक बसेस वापरणे फायदेशीर ठरणार आहे. याकरिता आवश्यक प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावा. पर्यटन व पर्यावरण मंत्री ना.श्री.आदित्य ठाकरे साहेबाकडून कोल्हापूर शहरास अशा इलेक्ट्रिक बसेस अनुदान स्वरूपात देण्याकरिता तात्काळ पाठपुरावा करू. तेजस्विनी योजनेचा लाभ कोल्हापूर महानगरपालिकेस मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी साठी प्रयत्न करू. सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस खरेदी करून वापरण्यासाठी नियमात शिथिलता आणण्याबाबत संबधित विभागाकडे विशेष पाठपुरावा करू. याकरिता आवश्यक सर्व प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तात्काळ सादर करावेत. के.एम.टी. चे उत्पन वाढून के.एम.टी.सेवेस उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही देत. कर्मचाऱ्यांचा रोस्टर, सेवा निवृत्ती पेन्शन, फिटर बी कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम, सेवा जेष्ठते प्रमाणे कामाचे नियोजन आदी मनपा स्तरावरील प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत. के.एम.टी. कर्मचाऱ्याना इतर मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ७ वा वेतन आयोगाचा लाभ देण्याबाबत अभ्यास करावा, अशा सूचना दिल्या.
या बैठकीस को.म.न.पा. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, उप- आयुक्त रविकांत आडसूळ, सहा. आयुक्त विद्यादेवी पोळ, पी.एन.गुरव, संजय इनामदार, अरुण केसरकर, रवी दुपकर, पोर्च मॅनेजर किरण चव्हाण, के.एम.टी कर्मचारी संघटनेचे निशिकांत सरनाईक, विश्वनाथ चौगुले, एम.डी.कांबळे, जितेंद्र संकपाळ, आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In Commercial

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…