कोल्हापूर : ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळ्याच्या चौथ्या वर्षीचा कार्यक्रम आज कोल्हापूरचे सुपुत्र व बेंगलोरचे पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी गेल्या वर्षभरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव मोठे करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार अनाथ आणि वंचितांसाठी आयुष्यभर झटणारे डॉ. सुनील कुमार लवटे, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान …