प्रशासन आणि नागरिक, व्यापारी वर्गाच्या समन्वयाने शहराचा विकास साध्य करू : क्षीरसागर महापालिका गाळेधारकांच्यावतीने श्री.राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपलिका क्षेत्रात विविध बाजारपेठात साधारणत: अडीच हजार गाळेधारक असून, गेली अनेक वर्षे नियमितपणे गाळेभाडे महानगरपालिका प्रशासनास देत आहेत. सन २०१६ पर्यंत गाळेधारक जुन्या नियमावलीनुसार आकारण्यात येणाऱ्या भाड्याची रक्कम भरत होते. पण २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर गाळेधारकांनी शिग्र …