Home Info प्रशासन आणि नागरिक, व्यापारी वर्गाच्या समन्वयाने शहराचा विकास साध्य करू : क्षीरसागर

प्रशासन आणि नागरिक, व्यापारी वर्गाच्या समन्वयाने शहराचा विकास साध्य करू : क्षीरसागर

0 second read
0
0
14

प्रशासन आणि नागरिक, व्यापारी वर्गाच्या समन्वयाने शहराचा विकास साध्य करू : क्षीरसागर

महापालिका गाळेधारकांच्यावतीने श्री.राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपलिका क्षेत्रात विविध बाजारपेठात साधारणत: अडीच हजार गाळेधारक असून, गेली अनेक वर्षे नियमितपणे गाळेभाडे महानगरपालिका प्रशासनास देत आहेत. सन २०१६ पर्यंत गाळेधारक जुन्या नियमावलीनुसार आकारण्यात येणाऱ्या भाड्याची रक्कम भरत होते. पण २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर गाळेधारकांनी शिग्र सिद्ध गणका (रेडीरेकनर) नुसार भाडे महानगरपालिकेला देण्याबाबत शासन निर्णय झाला. परंतु, सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रलंबित राहिल्याने सन २०१६ ते २०२२ पर्यंत गाळेधारकांचे भाडे जुन्या पद्धतीने गृहीत धरून गाळाधारकांनी सन २०१६ पासून वारंवार भाडे महानगरपालिका प्रशासनास अदा करणेबाबत पाठपुरावा केला होता. परंतु, कोणतेही धोरण शासनाकडून निश्चित झाले नसल्याचे कारण सांगून महापालिका प्रशासनाने भाडे भरून घेण्यास असमर्थता दर्शविल्याने सुमारे ७ वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेवून व्यापाऱ्यांवर अन्याय होवू नये, त्याचबरोबर महानगरपालिकेचेही आर्थिक नुकसान होवू नये याकरिता सुवर्णमध्य काढण्यात शासन स्तरावर प्रयत्न केले. महानगरपालिका प्रशासनाच्या झालेल्या विविध बैठकांमध्ये गाळेधारकांची भूमिका श्री.राजेश क्षीरसागर यांनी सक्षमपणे मांडली. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या संबधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून संयुक्तिक बैठकीद्वारे हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने काल महानगरपालिका अधिकारी, चेंबर ऑफ कॉमर्स चे प्रमुख पदाधिकारी व महानगरपालिकेचे गाळेधारक यांची संयुक्तिक बैठक पार पडली. यामध्ये जीएसटी, दंड, व्याजाचा उल्लेख हमीपत्रातून काढून जे थकलेले भाडे आहेत ते भरण्याचा निर्णय झाला. यामुळे जवळपास २५ कोटी रुपयांचे सात वर्षातील थकीत जुने भाडे भरण्याचा मार्ग मोकळा झाला.
यानंतर महापालिका गाळेधारकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका ही “ड” वर्ग महानगरपालिका असून, महानगरपालिका प्रशासनाच्या आर्थिक उत्पन स्तोत्रांवर मर्यादा आहेत. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही यांची काळजी घेणे शहरवासीयांची जबाबदारी आहे. तर महापालिकेकडूनही नागरिकांवर, व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही असे निर्णय घेणे गरजेचे आहे. या प्रशासन आणि विविध करदाते नागरिक, व्यापारी बंधू यांच्या समन्वयाने शहराचा विकास साध्य होवू शकतो. त्यामुळे पुढील काळात अशा पद्धतीचा समन्वय ठेवून शहर विकासासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
यावेळी व्यापारी महासंघाचे सदानंद कोरगावकर, अमर क्षीरसागर, आयाज बागवान, महेश नष्टे, शिवाजी मोटे, संदीप वीर, सिद्धार्थ काक्षे, पियुष पटेल आदी महानगरपालिका गाळेधारक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In Info

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…