कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणूक १४ नोव्हेंबर रोजी असून या निवडणुकीमध्ये पदवीधर विभागातील १० जागेवर निवडणूक लढण्याचा निर्णय झाला आहे. आज सातारा, सांगली, आणि कोल्हापूर या विभागातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत युवसेना विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांनी शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक लढण्यासाठीचे मार्गदर्शन व सूचना दिल्या.शिवाजी विध्यापिठाच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व संस्थेच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे …