
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणूक १४ नोव्हेंबर रोजी असून या निवडणुकीमध्ये पदवीधर विभागातील १० जागेवर निवडणूक लढण्याचा निर्णय झाला आहे. आज सातारा, सांगली, आणि कोल्हापूर या विभागातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत युवसेना विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांनी शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक लढण्यासाठीचे मार्गदर्शन व सूचना दिल्या.शिवाजी विध्यापिठाच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व संस्थेच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे ठरले. दि. २९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळ पर्यंत पॅनेल ची घोषणा करण्यात येईल. असे जिल्हा प्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
शिवाजी विद्यापीठ सिनेट मतदार यांच्या पर्यंत संपर्क करण्यासाठी तालुका तालुका मेळावे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिनेटचे पूर्ण पॅनेलचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी रविकिरण इंगवले,सुनिल मोदी, हर्षल सुर्वे,मंजीत माने, अमृता सावेकर, विनायक जाधव, वैभव जाधव, अवदेश करंबे, कमलाकर जगदाळे, सुशील भांदिगिरे, अनिल पाटील, जयसिंग टीकिले,संतोष आयरे, प्रसाद पोवार, संतोष कांदेकर, किशोर दाभाडे,विनय क्षीरसागर, राहुल माळी, जयराम पोवार, युवराज मोरे,अवधूत पाटील,रवींद्र पाटील,सागर मावके, सुरेश पाटील,रितेश खोत उपस्थित होते.