कोल्हापूर : मंगळवार पेठेतील प्रसिद्ध कैलासगडची स्वारी मंदिर विश्वस्त समितीच्या उपाध्यक्षपदी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. आमदार चंद्रकांत जाधव हे मंदिर विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजीत करण्यात आली. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव होते. कैलासगडची स्वारी मंदिरात च्या धार्मिक व सामाजिक कार्यात आमदार …