Home Entertainment “व्हिक्टोरिया” मराठी चित्रपट लवकरच…

“व्हिक्टोरिया” मराठी चित्रपट लवकरच…

0 second read
0
0
24

कोल्हापूर : निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग स्कॉटलंडमध्ये त्यांच्या तिसऱ्या मराठी चित्रपट “व्हिक्टोरिया” साठी पुन्हा एकत्र आले आहेत. ती आणि ती , वेल डन बेबी चित्रपटाच्या  यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेवून येत आहेत . नुकतेच त्यांनी व्हिक्टोरिया या मराठी चित्रपटाची घोषणा केली. पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी व आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका या चित्रपटात आहे . हीरा सोहल ही अभिनेत्री पदार्पण करत आहे . जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद ओमकार गोखले , जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांची निर्मिती संस्था गुसबम्पस एंटरटेनमेंट चा एकत्रित तिसरा मराठी चित्रपट आहे . तसेच अभिनेता  पुष्कर जोग यांचा सोनाली कुलकर्णी सह हा तिसरा चित्रपट आहे , या पूर्वी ती आणि ती , तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी केले आहेत. आनंद पंडित , रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत , वैशल शाह हे सह निर्माता आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला आणि या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे .

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In Entertainment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…