
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील प्रसिद्ध कैलासगडची स्वारी मंदिर विश्वस्त समितीच्या उपाध्यक्षपदी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
आमदार चंद्रकांत जाधव हे मंदिर विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजीत करण्यात आली. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव होते.
कैलासगडची स्वारी मंदिरात च्या धार्मिक व सामाजिक कार्यात आमदार चंद्रकांत जाधव यांचा मोलाचा वाटा होता. यामुळे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जागी त्यांचे चिरंजीव सत्यजित जाधव यांची निवड करावी असा ठराव सर्व विश्वस्तांनी एकमुखी मंजूर केला. त्यामुळे मंदिर विश्वस्त समितीच्या उपाध्यक्षपदी सत्यजित जाधव यांची निवड करण्यात येत असल्याचे बबेराव जाधव यांनी जाहिर केले.
यानंतर सत्यजित जाधव व दश्मीता जाधव यांचा अध्यक्ष बबेराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक संभाजी जाधव, सचिव अशोक मिस्त्री सहसचिव विलास गौड, उदय कारंजकर, धनाजीराव जाधव, केशवराव पोवार, अजितराव जाधव, शिवाजी जाधव, किशोर भोसले, मंदिराचे पुजारी विठ्ठल जाधव व गणेश भोसले आदी उपस्थित होते. शिवशाहीर अजित आयरेकर यांनी आभार मानले.
फोटो ओळ
कैलासगडची स्वारी मंदिराच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्यजित जाधव यांचा सत्कार करताना अध्यक्ष बबेराव जाधव, बाजुला संभाजी जाधव, दश्मीता जाधव, अशोक मिस्त्री, विलास गौड आदी.