
कोल्हापूर: खेळ, खेळाडूंना दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी (आण्णां) नेहमीच पाठबळ दिले. कोल्हापूरातील क्रीडांगणाचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्व फुटबॉल संघाची स्वतःची टर्फ मैदान असावीत, यासाठी आण्णा प्रयत्नशिल होते. मात्र, दुर्देवाने आण्णा गेले आणि हे काम अपूर्ण राहिले. कोल्हापूरातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संधी द्या असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.मेरी वेदर ग्राउंड येथे आलेल्या नागरिकांशी जयश्री जाधव यांनी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.जयश्री जाधव म्हणाल्या, आण्णा स्वतः फूटबॉल खेळाडू होते. यामुळे त्यांनी संघ व खेळाडूना नेहमीच पाठबळ दिले. खेळाचे साहित्य, कीटबरोबर आर्थिक मदत केली. तसेच उल्लेखनिय कामगिरी केल्यानंतर खेळाडूला व विजयानंतर संघाला प्रोत्सहन दिले. क्रीडा क्षेत्रामध्ये कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले पाहिजे यासाठी आण्णा सदैव प्रयत्नशिल होते. आण्णांचे हे काम पुढे नेण्यासाठी मी कटिबध्द आहे.मॉर्निंग वॉकर्स, खेळाडू, संघाबरोबर आण्णांचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध होते. आण्णांच्या माघारी जयश्री जाधव वहिनीच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी नागरिकांनी दिला.यावेळी अॅड. इंद्रजित अडगुळे, माजी नगरसेविका मनीषा बुचडे, पूजा नाईकनवरे, आनंदा चव्हाण, राजेश मोरे, उमेश चांदणे, नीलेश भोपळे, किरण वडगावकर, वीरधवल शिंदे, राहुल वरुटे, अमित सुगावकर, निवास वाघमारे, श्याम अकबानी, एस. एल. पाटील, संभाजी पोवार, शिंदेसाहेब, वनिता अनिल सावंत, रोहिणी पाटील, जया निगडे, प्रशांत बोडखे, प्रदीप जाधव, विक्रम घोरपडे, सुरेश कांबळे, अनिल कांबळे, सागर पाटील, संजय पाटील, संतोष धामणेकर आदी उपस्थित होते.