
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल १८० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षाअखेरची ही आकडेवारी असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेच्या कोल्हापुरातील केंद्र कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. ढोबळ नफ्यातून अनुषंगिक तरतुदीच्या रक्कमा वजा जाता निव्वळ शिल्लक नफा ४४ कोटी रुपये होत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, रणवीरसिंह गायकवाड, विजयसिंह माने, सौ स्मिता गवळी आदी संचालक तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक गोरख शिंदे, अकाउंट्स बँकिंगचे व्यवस्थापक विकास जगताप, सीएमए सेलचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, शासकीय लेखा परीक्षक सुनील नागावकर उपस्थित होते.