
कोल्हापूर विधानसभा उत्तर पोटनिवडणूकिसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 20 टक्के मतदान झाले.तर 1 वाजेपर्यंत 34 टक्के मतदान झाले.
पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील तसेच कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार काँग्रेसच्या श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आपला मतदानाचा हक्क विधानसभा उत्तर पोटनिवडणुकीमध्ये बजावला.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिका येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजावला. यावेळी देवस्थान समितीच्या मा.कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, सौ. दिशा क्षीरसागर आणि पुष्कराज क्षीरसागर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.