
कोल्हापूर: कोल्हापुरात आल्यापासून दहशत सुरू असल्याचे माझ्या कानावर पडत आहे पण जर जनता पेटून उठली तर तुम्हाला शिल्लक ठेवणार नाही गोकुळची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही लोक डाऊन जाहीर केले तोपर्यंत कोरोनामुळे ज्यांचे मृत्यू झाले त्यांना तुम्हाला जाब द्यावा लागेल असा इशारा विरोधी पक्षनेते व भाजपचे प्रवक्ते देवेंद्र फडणवीस यांनी दिला उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या सभेमध्ये ते बोलत होते सभेला प्रचंड जनसमुदाय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलम रद्द करण्याची हिंमत दाखवली कोल्हापुरातही पालकमंत्री असताना चंद्रकांत दादांनी टोल रद्द केला आताही भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये कोल्हापूरच्या विकासावर भर देण्यात आलेला आहे पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सत्यजित कदम यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले