
महाविकास आघाडीच्या विजयाने मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांचे नेतृत्व सिद्ध : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : दिगवंत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण, भाजपने ही निवडणूक लादली. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाईचे सत्र सुरु असताना, भाजपने या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून मतदारांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता जातीपातीच्या राजकारणाला थारा देत नाही, हे या निकालातून अधोरेखित होते.
२०१९ च्या निवडणुकीमध्ये माझी बदनामी करून पराभव करण्यात आला. यास भाजपची गद्दारीची तितकीच कारणीभूत आहे. पण पराभवानंतर खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने शहरातील विकास कामे, प्रश्न सोडविण्यासाठी अविरत कष्ट करत आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढवावी अशी शिवसैनिकासह सर्वसामन्य जनतेची देखील अपेक्षा होती. परंतु, शिवसेनेत मातोश्री चा आदेश अंतिम असतो. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांच्या पाठीशी ठाम राहून प्रचारात अग्रभागी राहिलो. शिवसैनिकांमध्ये नाराजी असताना त्यांची नाराजी दूर करून शिवसेनेचं एक अन एक मत आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या पारड्यात टाकले. निवडणूक जाहीर झाल्यानंतरची स्थिती आणि शिवसेना प्रचारात सक्रीय झाल्यानंतरची स्थिती यात जमीन-आस्मानाचा फरक होत. महाविकास आघाडीच्या विजयात शिवसेनेचा मोलाचा वाट असून, पुढील काळात कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जिल्ह्यातील शिवसैनिकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला विजय हा देशातील परिवर्तनाची नांदी आहे. महाविकास आघाडीवर कितीही घात झाले तरी मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मजबूत असल्याचे या विजयातून दिसून येत असून, महाविकास आघाडीची ताकत वाढविणारा हा विजय आहे. या विजयातून देशातील बदल अपेक्षित असून, महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुखांनी भाजपला देशातून हद्दपार करण्याच्या केलेल्या निर्धाराकडे उचलले पहिले पाऊल म्हणजे हा विजय आहे. कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या विजयासाठी झटलेल्या महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना, विजयात मोलाचा वाटा उचललेल्या शिवसैनिकांचे आणि प्रचारासाठी मुंबई, ठाणे येथून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांचे विशेष आभार. तसेच आमदार श्रीमती जयश्री जाधव यांना “आमदार” की च्या हार्दिक शुभेच्छा..