
कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या जयश्री चंद्रकांत जाधव यांचा 18838 मतांनी दणदणीत विजय झाला.
भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला असून
जयश्री चंद्रकांत जाधव काँग्रेसच्या उमेदवार निवडून आल्या. त्यांना 92013 मते पडली.तर सत्यजित कदम जे भाजपचे उमेदवार होते त्यांना 73174 मते मिळाली.
विधानसभा निवडणुकीतील माझा विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा, कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. आण्णांच्या माघारी कोल्हापूरच्या जनतेने माझी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. यापुढील काळात आपल्या सर्वांच्या सहकार्याने शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी आहे आणि विकासासाठी मी कटीबद्ध आहे. आण्णांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक आराखडे तयार केले आहेत. त्यांचे नियोजनबध्दरित्या पूर्तता करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे.
प्रचारात कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्दे घेऊन मी जनतेच्या समोर गेलो. यावेळी अबालवृद्ध नागरिक, महिला, युवावर्गाकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळाला. याची प्रचिती मतदानातून मिळाली आहे. कोल्हापूरकरांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे.अशी प्रतिक्रिया जयश्री चंद्रकांत जाधव यांनी दिली.