
संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर येथील संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड करण्यात आली.शेलाजी वन्नाजी हायस्कुल येथे बैठकीत ही निवड करण्यात आली.तरी इतर पदाधिकारी: खजनिस सोनलकुमार घोटणे, सेक्रेटरी ओंकार खराडे,
सचिव कपिल यादव, सहसचिव निलेश रसाळ असून यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
यावेळी रवींद्र पाटील (आण्णा), बाळासाहेब मुधोळकर, संतोष लाड (अप्पा), संजय तोरसकर ,प्रवीण सोनवणे, विशाल शिराळकर, विनायक चंदुगडे, बबलू ठोंबरे ,सागर गिरींजे, सुरज पाटील, (छोट्या), चेतन रणदिवे, चिनू खाडे तसेच भागातील सर्व तालीम संस्था, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंडळाच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात तरी शिवजयंती उत्सव निमित्ताने विविध प्रकारच्या महिलांसाठी आणि लहान मुलांच्या स्पर्धा आयोजित केल्या असल्याचे नूतन अध्यक्ष सुमित पवार व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.