Home News राजर्षि शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या वास्तूंचे संवर्धन हीच खरी आदरांजली : राजेश क्षीरसागर

राजर्षि शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या वास्तूंचे संवर्धन हीच खरी आदरांजली : राजेश क्षीरसागर

0 second read
0
0
23

कोल्हापूर  : लोकराजा राजर्षि शाहू महाराज कोल्हापूरचे भाग्यविधाते आहेत. त्यांचा वारसा कोल्हापूरकराना लाभला हे आपल्या सर्वांचे भाग्य समजतो. राजर्षि शाहू महाराजांनाची कृपादृष्टी लाभलेला कोल्हापूर जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे. व्यापार, क्रीडा, कला, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रातील राजर्षि शाहू महाराजांचे काम अलौकिक आहे. कोल्हापूरवासियांसाठी राजर्षि शाहू महाराजांनी स्थापिलेल्या अनेक वास्तू प्रेरणादायी आणि आनंददायी आहेत. या वास्तूंचे संवर्धन हीच खरी आदरांजली असून, या वास्तूंचे जतन, संवर्धन आणि विकास ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. उत्तरेश्वर पेठ येथील श्री नामदेव महाराज शिंपी समाज विद्यार्थी वसतिगृह येथे शेड बांधण्यासाठी .राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास विभागाकडून मंजूर रु.१० लाखांच्या निधीतील कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, स्वाभिमानी राजर्षि शाहू महाराजांनी करवीरवासियांना स्वाभिमानाने जगायला शिकविले. कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून विचारांचा वसा ठेवला आहे. राजर्षि शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दीनिमित्त दि.६ मे रोजी शंभर सेकंद स्तब्ध राहून लोकराजाना आदरांजली वाहावी, असे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले कि, आपल्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत शिंपी समाजाचे मोलाचे योगदान असून, शिंपी समाजाच्या उन्नतीसाठी आपण कटिबद्ध आहोत. आगामी काळातही शिंपी समाजास आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी निधी मंजूर केल्याबद्दल शिंपी समाजाच्या वतीने राजेश क्षीरसागर जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी मा नगरसेवक नंदकुमार मोरे, मा नगरसेवक किरण शिराळे, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, शिंपी समाजाचे सरपंच अध्यक्ष प्रताप क्षीरसागर, उपसरपंच अलका बकरे, खजिनदार जगदीश बोंगाळे, सेक्रेटरी राहुल काकडे, माजी अध्यक्ष किशोर नाझरे, महिला अध्यक्षा सुचिता महाडिक, हर्षराज कपडेकर, विनायक मुळे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…