
कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत आज 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी दिनी अवघं कोल्हापूर 100 सेकंद स्तब्ध झालं.. आज शुक्रवारी सकाळी ठीक 10 वाजता जिथं आहे तिथं 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला कोल्हापूरकरांनी अनोखी मानवंदना देवून राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्याचं स्मरण केलं..शाहू समाधी स्थळ येथे विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, एन.सी.सी.चे विद्यार्थी, नागरिक यांनी स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन केले.. श्री शाहू महाराज की जय ..! जयघोषाने समाधी स्थळ परिसर दुमदुमला