
कोल्हापूर: राजारामपुरी परिसरातील पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील व्यापारी, नागरिक, पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन यांच्या समवेत सविस्तर बैठक घेतली.छत्रपती राजाराम महाराज यांनी वसवलेली राजारामपुरी हि कोल्हापूर शहराच्या अर्थकारणाचे मोठे केंद्र असून काळाच्या ओघामध्ये वेगाने विकसित होत आहे. याठिकाणी उद्योग-व्यवसाय चांगल्याप्रकारे चालून अर्थकारणाला गती देण्याची प्रशासनाची भूमिका आहे.राजारामपुरी परिसर हा हार्ट ऑफ कोल्हापूर आहे. त्याठिकाणची पार्किंग आणि होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.राजारामपुरी परिसरातील व्यवसायिकांनी, बंदिस्त केलेले पार्किंग स्वत:हून खुले करण्यासंदर्भातही सर्वांना विनंती केली असून पोलीस विभाग आणि कोल्हापूर महानगरपालिकेला योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत.या परिसरातील रस्त्यांच्या साईट पट्ट्या वाढवण्याकरिता निधी देण्याबरोबरच, राजाराम उद्यानाकरिता एक कोटी रुपयांचा निधी आणि 9 नंबर शाळेच्या मैदानाच्या विकासाकरिता 25 लाखाचा निधी देण्यात येणार आहे.यावेळी आमदार जयश्री जाधव, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी उपमहापौर संजय मोहिते, ललित गांधी, सुभाष जाधव, दुर्गेश लिंग्रज, एड.बाबा इंदुलकर, विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, विनायक सूर्यवंशी, अनुप पाटील, माजी नगरसेवक अनिल कदम, शिवाजी कवाळे, प्रतिज्ञा उत्तुरे, माणिक पाटील – चुयेकर, शहर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, शहर वाहतूक निरिक्षक स्नेहा गिरी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.