Home News कोल्हापूरात पहिलेच इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटी रूपयांचा निधी मंजूर:पालकमंत्री ना. सतेज पाटील

कोल्हापूरात पहिलेच इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटी रूपयांचा निधी मंजूर:पालकमंत्री ना. सतेज पाटील

0 second read
0
0
14

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील “महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात पहिलेच उभारण्यात येणाऱ्या इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

श्री.पाटील म्हणाले, राज्यातील महानगरपालिकांना मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामासाठी अनुदान देण्यात येते. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर मनपाकरिता १० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.हा निधी उपलब्ध होण्यासाठी नगरविकास विभागाकडे माझ्या कार्यालयाकडून पाठपुरावा केला होता. सदर प्रकल्पाअंतर्गतची कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणी होणे गरजेचे असून या माध्यमातून मनपा क्षेत्रात इनडोअर स्टेडियमच्या कामासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या स्टेडियमच्या माध्यमातून क्रीडा संस्कृती जोपासत खेळाडू आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी, श्री.पाटील यांनी सांगितले.श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. जिल्ह्याची असलेली क्रीडा संस्कृती जोपासत खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या तयार होणाऱ्या इनडोअर स्टेडियममुळे खेळाडूंना सराव करण्यासाठी अधिकची जागा मिळणार आहे. खेळाडूंना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे.महाविकास आघाडी सरकार राज्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मी कोल्हापूरकरवासीयांकडून मनःपूर्वक आभार मानतो, अशा भावना पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी आमदार जयश्री जाधव संजय मोहिते ( मा. उपमहापौर ) नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…