
कोल्हापूर/ प्रतिनिधी:कोल्हापूर जिल्यातील उदयोन्मुख कलाकारांनी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने अस्सल नाणं कोल्हापूरी हा उपक्रम राबविण्यात येत आहे असे मत अभिनेता संजय मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.तसेच अस्सल नाणं कोल्हापूरी याद्वारे एकपात्री अभिनय व सोलो नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापूरच्या कलाकारांसाठी हा अभिनव उपक्रम असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते डॉ. शरद भुताडीया यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मौजे – खानापूरचे मुळचे लहानपणापासुन मुंबईत स्थाईक असलेले लेखक / दिग्दर्शक – अजित मारुती साबळे यांनी आतापर्यंत मराठी, हिंदी, गुजराती अशा २५ मालिकांसाठी लेखक – दिग्दर्शक, प्रोमो दिग्दर्शक, सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच आतापर्यंत पालखी, फांदी, पटरी बॉईज, वेलकम टु मॅरेज ब्युरो, मावशी अशा चित्रपटांचे लेखन – दिग्दर्शन केलेलं आहे, टी – सिरीज कंपनीच्या बऱ्याच गाण्यांचे ही दिग्दर्शन केलेलं आहे. तसेच कोरोनाच्या काळात “देवा तू सांगना कुठे गेला हरउनी” हे गाणं पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या स्टेटस व तोंडात रुळले ते गाणं देखील अजित साबळे यांच्या फांदी चित्रपटातील आहे. त्यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील खेडेगावापासून – शहरापर्यंत सर्व जिद्दी व हुशार कलाकारांसाठी चित्रपटसृष्टीत व्यासपीठ मिळाव म्हणून “अस्सल नाणं कोल्हापूरी” या शोची निर्मित केली असून शो मधून प्रत्येक तालुक्यातून तीन उत्कृष्ट डान्सर – तीन उत्कृष्ट कलाकार निवडले जातील. त्यांची अंतिम फेरी जिल्हा स्तरावर होईल. तसेच ध्वज क्रिएशन या संस्थेमार्फत पुढील प्रोजेक्टसाठी त्यांना संधी देण्यात येईल.
या स्पर्धा २१ मे ते २४ मे दरम्यान होतील. अंतिम स्पर्धा २९ मे रोजी जिल्हास्तरावर होईल.तरी स्पर्धकांनी तयार रहा. “असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धा वेळापत्रक पुढील प्रमाणे स्पर्धेचे ठिकाण – २१ मे शनिवार – राधानगरी, भुदरगड (गारगोटी), कागल (मुरगुड) २२ मे रविवार – करवीर (कोल्हापूर), शिरोळ, हातकलंगणे (ईचलकरंजी) २३ मे सोमवार – आजरा, गडहिंग्लज, चंदगड २४ मे- मंगळवार – पन्हाळा ( कळे), शाहुवाडी, (मलकापूर), गगनबावडा (तिसंगी).
यातून मिळणारा निधी वृध्दाश्रम आणि अंधमुलांच्या मदतीसाठी वापरला जाईल. तसेच ही संकल्पना वर्षानुवर्षे चालविण्याचा संकल्प लेखक – दिग्दर्शक अजित मारुती साबळे यांनी ठरवला असून. यासाठी विनय अजित निल्ले यांचे सहकार्य लाभले आहे.