
शुक्रवार दि. ०३ जून…. सकाळी ११ ची वेळ… सुप्रसिध्द सिनेअभिनेते व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर कोल्हापूरात आल्याचे समजताच मंत्री हसन मुश्रीफ कागलवरुन कोल्हापूरला आले. नाना ज्या हाँटेलात थांबले आहेत, त्याठिकाणी जाऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे स्वागत केले. मंत्री श्री. मुश्रीफ भेटण्यासाठी येत असल्याचे समजताच दस्तूरखुद्द नानाच त्यांच्या स्वागतासाठी खोलीच्या बाहेर लॉबीत येवून उभे होते. मुश्रीफ समोर येताच नानांनी त्यांना मिठी मारली.यावेळी नाना पाटेकर म्हणाले, “अरे तु इकडे कशाला आलास.. मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो.” यावेळी मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, “असं नाही…. पाहूण्यांचं स्वागत व आदरातिथ्य करणं ही आमची कोल्हापूरचे संस्कार आहेत.” यावेळी नाना आणि श्री. मुश्रीफ यांच्यात दिलखुलास गप्पा रंगल्या.