
कोल्हापूर: क्षणिक सुखासाठी,स्वार्थी पणा करून शिवसेना आणि सैनिकांना फसवून पळून जाणाऱ्याना माफी नाही.असा नारा देत हजारो शिवसैनिक कोल्हापूरच्या रस्त्यावर उतरले.
कट्टर शिवसैनिक काय असतो हे आज कोल्हापुरात समजले आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना यांचे साथ कधीच सोडणार नाही अशी वज्रमुठ धरून ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला शिवाजी चौकात साक्षी ठेवून हजारो शिवसैनिकांनी आज शपथ घेतली.