
कोल्हापूर / प्रतिनिधी:राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्यावतीने शाहू कृतज्ञता पर्वानिमित्त राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व ठेव योजनेचा शुभारंभ येत्या रविवारी ३ जुलै रोजी शाहू सांस्कतिक भवन, मार्केट यार्ड येथे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण देखील या कार्यक्रमास उपस्थित असणार आहेत. या कृतज्ञता पर्व ठेव योजनेत सर्वात जास्त व्याजदर जे ७.५० टक्के व्याजदर देण्यात येणार आहे अशी माहिती गव्हर्नमेंट बँकेचे अध्यक्ष शशिकांत तीवले, उपाध्यक्ष रमेश घाटगे, रवींद्र पंदारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्याच वेळी पद्माराजे पारितोषिक व सेवानिवृत्तांचा सत्कार समारंभ देखील करण्यात येणार आहे. यावेळी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बँकेकडून चष्मे वाटप देखील करण्यात येणार आहे.