Home Angle Business भारतातील एक सर्वात मोठी ज्वेलरी कंपनी कल्याण ज्वेलर्सने कोल्हापुरात नवे दालन सुरु

भारतातील एक सर्वात मोठी ज्वेलरी कंपनी कल्याण ज्वेलर्सने कोल्हापुरात नवे दालन सुरु

0 second read
0
0
46

कोल्हापूर : भारतातील एक सर्वात मोठी ज्वेलरी कंपनी कल्याण ज्वेलर्सने कोल्हापुरात नवे दालन सुरु केले आहे. शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर येथे मार्तंड कॉम्प्लेक्समध्ये नवे शानदार शोरूम सुरु करून कल्याण ज्वेलर्स ब्रँडने कोल्हापुरात पदार्पण केले आहे. हे या ब्रँडचे महाराष्ट्रातील अकरावे शोरूम आहे. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते व शहर वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी एस कल्याणरमण, कार्यकारी संचालक राजेश आणि रमेश कल्याणरमण यांच्या प्रमुख उपस्थितीत या शोरुमचे उद्घाटन करण्यात आले. कोल्हापूरकरांना अलंकार अतिशय आवडतात. त्यामुळे कल्याण ज्वेलर्सची दागिन्यांची नाविन्यपूर्ण व्हरायटी ही कोल्हापूरकरांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असे मधुरिमा छत्रपती यांनी सांगितले.
नव्या शोरूमबद्दल कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरमण म्हणाले, “कोल्हापूरमध्ये आमच्या पहिल्या शोरुमचा शुभारंभ करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या शहराच्या विकासाचा लक्षणीय वेग पाहता, या बाजारपेठेत व्यवसाय वृद्धीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. खरेदीचा श्रेणीतील सर्वोत्तम अनुभव प्रदान करणे, खरेदीसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि व्यक्तिगत स्वरूपाच्या सेवा देणारे वातावरण पुरवून आमच्या ग्राहकांच्या आणि एकंदरीत समाजाच्या सुरक्षेची व आरोग्याची काळजी घेणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
यंदाचा सीझन अतिशय अनोख्या शैलीत साजरा करत कल्याण ज्वेलर्स ब्रँडने देशभरातील आपल्या ग्राहकांसाठी एक बम्पर ऑफर सादर केली आहे. यामध्ये कल्याण ज्वेलर्सतर्फे भारतातील त्यांच्या कोणत्याही शोरूममधून खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांमधील प्रत्येक १० ग्रॅमसाठी अर्धा ग्रॅम सोने भेट म्हणून देणार आहे. १० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या दागिन्यांच्या खरेदीवर घडणावळीमध्ये १५% सूट मिळवून ग्राहक दागिने खरेदीत तात्काळ बचत करू शकतील, ही ऑफर काही निवडक दागिन्यांवर उपलब्ध आहे. ५०,००० रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या हिरे, अनकट आणि पोल्की दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना सरसकट ५,००० रुपयांची सूट मिळू शकेल. या बम्पर ऑफर्सचा लाभ ३० जून २०२२ पर्यंत घेता येईल.कल्याण ज्वेलर्समध्ये विकले जाणारे सर्व दागिने बीआयएस हॉलमार्क्ड असतात आणि अनेक शुद्धता तपासण्या यशस्वीपणे पार केल्यानंतरच विक्रीसाठी ठेवण्यात येतात. दागिन्यांच्या खरेदीसोबत ग्राहकांना ४-लेवल अश्युरन्स सर्टिफिकेशन मिळते ज्यामध्ये त्यांना एक्स्चेंज किंवा पुनर्विक्री काळात इन्व्हॉईसवर नमूद करण्यात आलेल्या शुद्धता मूल्यानुसार रक्कम अदा करण्याचे वचन देण्यात येते. अश्युरन्स सर्टिफिकेशनमुळे देशातील कोणत्याही कल्याण ज्वेलर्सच्या शोरूममधून दागिन्यांचे फ्री लाइफटाइम मेंटेनन्स करवून घेता येते. या नवीन शोरूममध्ये आणि संपूर्ण देशभरात कल्याण ज्वेलर्सने नववधूंसाठी खास तयार केलेले मुहूरत कलेक्शन उपलब्ध करवून देण्यात आले आहे. त्यासोबत त्यांचे इतर लोकप्रिय ब्रँड्स देखील असणार आहेत – तेजस्वी (पोल्की ज्वेलरी), मुद्रा (हातांनी घडवण्यात आलेले अँटिक दागिने), निमाह (टेम्पल ज्वेलरी) ग्लो (डान्सिंग डायमंड्स), जिया (सॉलिटेयरसारखे हिऱ्यांचे दागिने), अनोखी (अनकट हिरे), अपूर्व (खास प्रसंगी वापरावयाचे दागिने), अंतरा (वेडिंग डायमंड्स), हेरा (रोज वापरू शकू असे हिरे) आणि रंग (मौल्यवान खड्यांचे दागिने) यांचा यामध्ये समावेश आहे. कल्याण ज्वेलर्सच्या पोर्टफोलिओमध्ये एक लाखांहून जास्त आधुनिक व पारंपरिक डिझाइन्स आहेत ज्यामध्ये दररोज वापरता येतील अशा, नववधूसाठी खास तयार करण्यात आलेल्या तसेच सणासुदीला वापरण्याच्या शानदार दागिन्यांचा समावेश आहे.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In Angle Business

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…