
कोल्हापूर : जयप्रभा स्टुडीओ संदर्भात शासन स्तरावर सकारात्मक प्रयत्न सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हा प्रश्न लवकरच मार्गी लावतील. परंतु, या विषयाची राजकीय पोळी भाजून कलाकार बांधव आणि कोल्हापूर वासियांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम रविकिरण इंगवले यांच्याकडून होत असून, इंगवले यांनी हे धंदे बंद करावेत. कलाकार आणि कोल्हापूर वासीयांच्या भावनांचा आम्हाला आदर असून, ही जागा शासनाकडे कायदेशीररीत्या हस्तांतरित करण्यास आम्ही सर्व संचालक यापूर्वीच सहमती दर्शविली आहे. त्यामुळे इंगवले नी वैयक्तिक स्वार्थापोटी केलेल्या बदनामीकारक आंदोलनाबाबत त्यांच्यावर रु.५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत असल्याचे, श्री.ऋतुराज क्षीरसागर यांनी सांगितले.आज रविकिरण इंगवले यांनी स्टंटबाजीतून केलेल्या आंदोलनास त्यांनी सडेतोड उत्तर देत इंगवले यांनी पाठविलेले चेक आणि त्याकरिता केलेला खर्च श्री.ऋतुराज क्षीरसागर यांनी सव्याज पोस्टाद्वारे परत केला. यासह खर्चाची रक्कम म्हणून चिल्लर पाठवीत, त्यांची पात्रता दाखवून दिली.
यावेळी ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, फेब्रुवारी २०२० मध्ये महालक्ष्मी स्टुडीओ एल.एल.पी. भागीदारी संस्थेच्या वतीने स्टुडीओची उर्वरित जागा कायदेशीररित्या खरेदी केली आहे. यात आम्ही बंधूनी भांडवली गुंतवणूक केली आहे. या जागेतून कलेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडावे, स्टुडीओच्या पुरातन वास्तूंचे जतन व्हावे, त्यास कोणताही धक्का लागणार नाही, ही आमच्या कंपनीची प्रामाणिक इच्छा होती. पण, जनतेच्या भावनांचा आदर ठेवून आम्ही सदर जागा शासनास हस्तांतरित करण्याचा यापूर्वीच निर्णय घेतला आहे. याबाबत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून नगरविकास विभागास अहवालही सादर करण्यात आला आहे. या प्रश्नी दि.२७ मे २०२२ रोजी मंत्रालय स्तरावर बैठक आयोजीत करण्यात आली होती. पण, काही तांत्रिक अडचणी आणि श्री.राजेश क्षीरसागर यांना अचानक रुग्णालयात दाखल करावे लागल्याने सदर बैठक पुढे ढकलण्यात आली. याची माहिती कलाकार बांधवांना असून पुढील काही महिन्यातच हा प्रश्न मार्गी लागेल, अशी आमच्या संचालक मंडळास खात्री आहे.परंतु, जयप्रभा स्टुडीओच्या माध्यमातून राजकीय स्टंटबाजी करत पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रयत्न रविकिरण इंगवले यांच्याकडून केला जात आहे. रविकिरण इंगवले हे मुळातच अडाणी व खंडणीखोर असून, अशा आंदोलनातून जनतेची व कलाकारांची दिशाभूल करून वैयक्तिक लाभापोटी खंडणीची अपेक्षा आमच्या कंपनीकडून ठेवत असतील. तर, आम्हीही संचालक मंडळ सक्षम आहोत. आंदोलनाचा गैरफायदा घेवून सुरु असलेल्या मर्कटलीला तात्काळ बंद कराव्यात. रविकिरण इंगवले यांनी आंदोलन घेण्यापूर्वी कंपनी कायदा तपासवा इतकी त्यांची बुद्धीमत्ता नाही. त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव येते.राजकीय स्टंबाजीतून असा बदनामीकारक प्रकार इंगवले यांच्याकडून सुरु असून, वर्षानुवर्षे बाप बदलन्याच काम करणाऱ्या व्यक्तीकडून अशाच स्टंटबाजीची अपेक्षा असते. रविकिरण इंगवले यांचे आरोप वैफल्यग्रस्तातून होत आहे.