Home News साज प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण

साज प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण

0 second read
0
0
13

कोल्हापूर : येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये सप्टेंबरमध्ये होणाऱ्या साज या मशिनरी प्रदर्शनाचे निमंत्रण जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.कोल्हापूरचा साज महाराष्ट्राचा ताज या टॅगलाईन अंतर्गत होणारे केएनसी सर्व्हिसेस प्रस्तुत, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आयोजित व स्थानिक संघटनांच्या सहयोगाने प्रदर्शन आयोजित केले आहे. कोल्हापूर जिल्हा दागिने उत्पादनाचे मोठे केंद्र आहे. जवळपास २५ हजार कारागीर या व्यवसायावर अवलंबून आहे, मात्र त्यांनी तंत्रज्ञानाऐवजी पारंपरिकतेवर भर दिला. त्यामुळे देशभर नाही तर जगभर ओळख असणाऱ्या येथील दागिन्यांची काळाच्या ओघात मागणी कमी झाली आणि आपल्यानंतर कित्येक शहरांनी तंत्रज्ञानाचा वापर केला व तेथील दागिने आजघडीला सर्वदूर ओळखू जाऊ लागले आहेत. एक दागिना साधारण आठ कारागिरांच्या हातून जाऊन तयार होतो. त्या दृष्टीने त्यासाठी आवश्यक मशिनरींचे प्रदर्शन येथे महासैनिक दरबार हॉल येथे १२ व १३ सप्टेंबरला होत आहे. विशेष करून चांदीच्या दागिन्यांसाठी लागणाऱ्या मशिनरीच्या स्टॉलबरोबर स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांचेही निवडक स्टॉल असतील. सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत होणाऱ्या प्रदर्शनासाठी कोल्हापूरच नाही तर सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव व गोवा येथून सराफ व्यावसायिक उपस्थित राहतील.दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात फक्त प्रदर्शनच नाही तर व्यावसायिकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होण्याच्या दृष्टीने संबंधित चर्चासत्रे, गटचर्चांचे आयोजन केले आहे.दरम्यान, यावेळी हर घर तिरंगा उपक्रमाचे उदघाटनही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी कोल्हापूर चेंबरकडून ५०० ध्वज घेण्यात आले आहे. हे ध्वज ज्यावेळी रोड शोच्या वेळी विविध शहरांत कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे पदाधिकारी जातील त्यावेळी तेथे तेथे वितरीत करणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…